सोलापूर : गाळपाच्या पहिल्या दिवसापासून २१ नोव्हेंबरपर्यंत आलेल्या उसाला पहिल्या हप्त्यापोटी प्रतिटन २७०० रुपये अदा करण्यात आल्याची माहिती जयहिंद कारखान्याचे प्रेसिडेंट बब्रुवान माने-देशमुख यांनी दिली. माने- देशमुख म्हणाले कि, ऊस बिलासोबतच तोडणी वाहतूकदारांचीही बिले अदा करण्यात आली आहेत. दररोज ९००० मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात येत आहे. आजपर्यंत एक लाख ४५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करण्यात जयहिंद परिवार यशस्वी ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.
बब्रुवान माने- देशमुख म्हणाले कि, गळीत हंगाम पूर्ण होईपर्यंत दिलेल्या शब्दाप्रमाणे दर आठवड्याला ऊस बिले व वाहतूकदारांची बिले वेळेत अदा करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस जयहिंद शुगरकडे गाळपाला देण्याचे आवाहन बब्रुवान माने-देशमुख यांनी केले. तोडणी वाहतूकदारांना ८५ टक्क्यांपर्यंत कमिशन अदा करण्यात येत आहे. ऊस उत्पादकांचा ओढा जयहिंद शुगरकडे वाढत असून उपलब्ध वाहतूक यंत्रणेत आणखी गाड्यांची आवश्यकता वाढली असून वाहतूकदारांनी जय हिंद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.