नवी दिल्ली : देशामध्ये सातत्याने कोरोना संक्रमणाचा फैलाव वाढतच आहे. बुधवारी 90,123 नवे रुग्ण समोर आले आहेत. याबरोबरच देशामध्ये कोविड -19 च्या रुग्णांची संख्या वाढून 50 लाख पेक्षा अधिक झाली आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे, कोरानामुक्त होणार्यांची संख्याही वाढत आहे. आकड्यांनुसार,आतापर्यंत 39 लाख 42 हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून बुधवारी सकाळी आलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात 1,290 लोकांच्या मृत्युमुळे आता मृतांची संख्या वाढून 82,066 झाली आहे. देशामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 50,20,360 झाला आहे. यापैकी 9,95,933 लोकांवर उपचार सुरु आहे आणि 39,42,361 लोक बरे झाले आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून जाहीर करण्यात आलेंल्या आकड्यांनुसार, देशभरामध्ये 15 सप्टेंबर पर्यंत एकूण 5,94,29,115 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, ज्यापैकी मंगळवारी एका दिवसात 11,16,842 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.