पडरौना, उत्तर प्रदेश: अधिक पाऊस, रेडरॉट आणि उकठा रोगामुळे यंदा ऊस शेतकर्यांना सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. ऊस विभागाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला आहे. आतार्यंत 79 दिवसांमध्ये 1758 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यामुळे जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांअंतर्गत 9330 हेक्टर क्षेत्रातील ऊसपीक रोग आणि वाळल्यामुळे खराब झाले आहे. 22 सप्टेंबर ला ऑनलाइन समीक्षा बैठक़ीमध्ये खासदार आणि आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाळलेल्या ऊसाचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते, पण आतापर्यंत सर्वे पूर्ण होवू शकलेला नाही.
नेबुआ नौरंगिया क्षेत्रातील सौरहा खुर्द येथील शेतकरी विश्वनाथ भगत यांनी सांगितले की, यावर्षी पावसाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहे. यामुळे ऊसाच्या पीकासाठी लावलेला पैसा बुडाला आहे. तमकुहीराज तहसील क्षेत्रातील मिश्रौली निवासी व्यास कुशवाहा यांनी सांगितले की, आठ कट्टा क्षेत्रफळामध्ये ऊसाचे पीक वाळले आहे. याची भरपाई मिळाली नाही तर पुढची पीक लागवड होवू शकणार नाही. बिरवट कोन्हवलिया गावातील मोतीलाल यांनी सांगितले की, अत्यधिक पावसामुळे ऊसाच्या पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे 10 कट्टा ऊसाचे पीक वाळले आहे. फायदा काहीच नाही, तर पूंजी बुडाली आहे. अमवादीगर निवासी नरेश पटेल यांनी सांगितले की, त्यांची जवळपास दोन एकर ऊसाचे पीक वाळले आहे. त्यांनी भरपाई देण्याची मागणी केली आहे.
जिल्हा ऊस अधिकारी वेदप्रकाश सिंह यांनी सांगितले की, यावर्षी जिल्ह्यामध्ये 9,330 हेक्टर क्षेत्रफळामध्ये ऊसाच्या पीकाचे रेडरॉट, उकठा रोग आणि पावसामुळे नुकसान झाले आहे. ऊसासाठी एक वर्षामध्ये 1200 मिलीमीटर पाऊस गरजेचा असतो, पण 1758.1 मिलीमीटर पाऊस झाला, ज्यामुळे ऊसाचे पीक अधिक प्रभावित झाले आहे. ऊस विभागाकडून पीकाची नुकसान भरपाई देण्याचे कोणतेही प्रावधान नाही. याबाबत शासनाने कोणतेही पत्र दिलेले नाही. आता पूर प्रभावित ऊसाचा सर्वे केला जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.