नवी दिल्ली : देशात सलग ९३ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी २२ मे रोजी इंधन मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल दरात बदल केला होता. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला महागड्या पेट्रोल दरापासून कोणताही दिलासा मिळालेला नाही. आज सकाळी सहा वाजता ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात आज, मंगळवारी कच्च्या तेलाच्या दरात हलकी वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड ९७ डॉलर प्रती बॅरलवर आले आहे. याशिवाय डब्ल्यूटीआय क्रूडमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. हा दर ९०.२३ डॉलर प्रती बॅरलवर स्थिर आहे. देशातील चार महानगरातील इंधन दरावर एक दृष्टिक्षेप टाकला असता दिल्लीत आज पेट्रोल ९६.७२ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रती लिटर दराने मिळत आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रती लिटरने विक्री केले जात आहे. चेन्नईत १०२.६३ रुपये प्रती लिटर दराने पेट्रोल आणि ९४.२४ रुपये दराने डिझेल मिळत आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रती लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रती लिटर दराने विक्री केली जात आहे. देशातील इतर सर्वच राज्यांतील इंधन दराची स्थिती जैसे थे आहे.