नवी दिल्ली: देशामध्ये कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात फैलावले आहे. गुरुवारी पुन्हा एकदा एका दिवसात कोरोनाच्या नव्या रुग्णांनी सर्व विक्रम तोडले आहेत. गुरुवारी 95,735 नवे रुग्ण समोर आले आहेत. या नव्या रुग्णांसह देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 44 लाख 65 हजारापेक्षा अधिक झाली आहे. तसेच कोरोनातून बरे होणार्या रुग्णांची संख्या वाढली आहे. आकड्यांनुसार, आतायर्पंत 34 लाख 71 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात 1,172 लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढून 75,062 इतकी झाली आहे. देशामध्ये संक्रमणाच्या केसेस वाढून 44,65,864 झाल्या आहेत. त्यापैकी 9,19,018 इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आणि 34,71,784 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) कडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशभऱामध्ये 9 सप्टेंबर पर्यंत एकूण 5,29,34,433 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, ज्यापैकी बुधवारी एका दिवसात 11,29,756 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.