नवी दिल्ली :
भारतामध्ये गेल्या 24 तासात 96,424 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. आणि 1,174 लोकांचा मृत्यु झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, देशामद्ये एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून 52,14,678 झाली आहे ज्यामध्ये 10,17,754 रुग्ण सक्रिय आहेत. आणि 41,12,552 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर देशभरामद्ये आतापर्यंत कोरोनामुळे 84,372 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जवळपास 60 टक्के सक्रिय रुग्ण पाच सर्वात अधिक प्रभावित राज्यांमधून आहेत. 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश असे आहेत, जिथे आजही 5,000 पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. आईसीएमआर नुसार, कोविड-19 साठी 17 सप्टेंबर पर्यंत 6,15,72,343 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी गुरुवारी 10,06,615 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी सांगितले की, भारतामध्ये कोरोना मृत्युदर 1.64 टक्क्याबरोबर जगामध्ये सर्वात कमी आहे. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारचे ध्येय या दराला कमी करुन एक टक्क्यापेक्षा खाली आणणे हे आहे.
राज्यसभेमध्ये चर्चेदरम्यान उत्तर देताना हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशामध्ये कोरोनामुक्त होणारा दर 78 ते 79 टक्के आहे. कोरोनामुक्त होण्याचा इतका मोठा दर जगातील अगदी मोजक्या देशामंध्ये दिसून आला आह. मंत्र्यांनी सांगितले की, देशामध्ये कोरोनारुग्ण भलेही 50 लाखावर आहेत, पण उपचाराधीन रुग्णांची संख्या 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. देशामद्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू यूरोपातील अनेक देशांच्या तुलनेत कमी आहेत . हर्षवर्धन यांनी सांगितले की, भारत कोरोना तपासणी दराच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकण्यास ही कटीबद्ध आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.