विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडून ९७ टक्के एफआरपी अदा : आ. बबनराव शिंदे

सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या युनिट नंबर १ पिंपळनेर आणि युनिट नंबर 2 करकंबतर्फे २०२२ – २३ गाळप हंगामातील उसाची आतापर्यंत ९७ टक्के एफआरपीप्रमाणे ऊस बिले देण्यात आली आहेत. आगामी हंगामात प्रति टन २७०० रुपयेप्रमाणे दर देणार असून एफआरपीपेक्षा प्रति टन ५० रुपये जादा दर देणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

आ. शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी कारखान्याच्या युनिट नंबर १ पिंपळनेरमध्ये २०२२-२३ हंगामामध्ये विक्रमी १८ लाख ४१ हजार ४२० मेट्रिक टन उसाचे गाळप करून १६ लाख ५२ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. यूनिट नंबर 2 करकंबतर्फे 5 लाख 28 हजार 285 मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५ लाख २२ हजार ७४५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. आ. शिंदे म्हणाले, शुगरकेन कंट्रोल ऑर्डरमधील तरतुदीनुसार एफआरपी रक्कम घेण्याबाबत ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी करार झाल्याप्रमाणे एफआरपी देण्यात येणार आहे. ते म्हणाले, विठ्ठलराव शिंदे कारखान्यात २०२१-२२ व २०२२–२३ हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० दिवसात उसाचे बिल देण्यात आले आहे. गाळपानंतर १० दिवसात पेमेंट देणारा विठ्ठलराव शिंदे राज्यात एकमेव कारखाना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here