शेतकऱ्यांचे ९८ कोटी रुपये थकवले, कारखान्यांना बजावली नोटीस

रामपूर : राज्यात ऊस बिलाच्या मुद्यावरुन राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी या प्रश्नावरुन सरकारची कोंडी केली आहे. मात्र, साखर कारखाने बिले देण्यास उशीर करत आहेत. दोन कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ९८ कोटी रुपये थकवले आहेत. बिले न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांना तिसरी नोटीस पाठवली आहे.

जवळपास ८० टक्के ऊसाचे गाळप झाले आहे. पुढील महिन्यात गाळप बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, दोन कारखाने ऊस बिले देण्यास टाळाटाळ करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना प्रसासनाकडून ऊस बिलांचा आढावा घेतला. त्यावेळी करीमगंज साखर कारखान्याकडे ७६.८० कोटी आणि बिलासपूर कारखान्याकडे १२.८० कोटी रुपये थकीत असल्याचे उघड झाले.

दरम्यान, त्रिवेणी साखर कारखान्याने १४ दिवसांची सर्व बिले दिली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखाना प्रशासनाला लवकर बिले देण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच कारखान्यांना नोटिसा दिल्या आहेत. जिल्हा ऊस अधिकारी हेमराज यांनी सांगितले की, त्यांच्या माध्यमातून नोटीस पाठविण्यात आली आहे. लवकर पैसे न देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here