भारतीय हवामान विभागाने पुढच्या पाच दिवसांपर्यंत पूर्व, उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने ओडिसा बाबत 26 ऑगस्ट आणि छत्तीसगड साठी 27 ऑगस्ट चा रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड मध्ये 28 ऑगस्टपर्यंत मोठा पाऊस होवू शकतो. छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि पश्चिम राजस्थान मध्ये 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय आहे आणि पुढच्या दोन किंवा तीन दिवसांदरम्यान अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, उत्तर पश्चिम भारतामध्ये 28 ऑगस्टपर्यंत अरब सागर मधून दक्षिणे कडे खालच्या जोराच्या वार्याचे अभिसरण आहे.
हवामान विभागाने सांगितले की, चार पाच दिवसांमद्ये बंगाल च्या खाडी वर आणि त्याच्या आसपास बनलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या पश्चिम उत्तर पश्चिम कडे वाढण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे ओडिसा, गंगा तटीय पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश आणि पश्चिमी राजस्थान मध्ये 26 ते 28 ऑगस्ट च्या दरम्यान पाऊस होण्याचा अंदाज आहे.
हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगढ़ आणि पूर्वी मध्य प्रदेशतील विविध ठिकाणी मोठा पाऊस होवू शकतो. याशिवाय जम्मू-कश्मीर, लद्दाख, गिलगित-बलुचिस्थान, मुजफ्फराबाद, पंजाब, हरियाणा, चंडीगढ़मध्ये मोठा पाऊस होण्याचा अंदाज आहे. याबरोबरच दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिमी राजस्थान, पूर्वी मध्यप्रदेश, विदर्भ (महाराष्ट्र), बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम,आसाम , मेघालय, तेलंगाना, तमिळनाडु, पुडुचेरी आणि कराईकाल मध्ये 26 ऑगस्टला मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.