साखर कारखाना सुरु करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आप कार्यकर्ते

रुद्रपूर: 2017 मध्ये बंद करण्यात आलेला सितारगंज साखर कारखाना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी आप कार्यकर्त्यांनी एसडीएम यांच्या माध्यमातून मुख्यमत्र्यांना मागणीचे निवेदन दिले आहे. कार्यकर्त्यांनी 15 दिवसांमद्ये कारवाई झाली नाही तर तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आप प्रदेश अध्यक्ष एलएस करेल यांच्या नेतृत्वामध्ये आप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या मागणीपत्रामध्ये ऊस शेतकर्‍यांची थकबाकी भागवणे, काशीपूरमध्ये बंद असलेल्या साखर कारखान्यातील मजुरांचे देय 15 दिवसाच्या आत भागवण्याची मागणी केली आहे. आप प्रदेश अध्यक्षांनी आरोप केला की, राज्य सरकारने शेतकरी आणि मजुरांचे शोषण केले आहे. कोरोना काळात अडचणीत ओलेल्या जनतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सरकार समाजाच्या सर्व वर्गांतून टॅक्स वसुल करत होते पण शेतकर्‍यांची थकबाकी भागवली जात नाही. राज्य सरकारने शेतकर्‍यांची उत्पादने खरेदी करण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. प्रवाशांसाठी सरकारकडे कोणतीही योजना नाही. पर्यटन आणि दुसरे व्यवसायही बंद आहेत. बेरोजगारी वाढत आहे. राज्य सरकारने मौन धारण केले आहे. कोरोना काळात उपचारासाठी कोणताही प्रबंध नसल्याने मृत्यु होत आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here