नवी दिल्लीः सरकार ने सोमवारी कंपोजीशन योजने अंतर्गत येणाऱ्या डीलर्ससाठी आर्थिक वर्ष 2019- 20 चा जीएसटी रिटर्न भरण्याची मुदत दोन महिने वाढवून 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत केली आहे. गेल्या काही महिन्यात ही मुदत दुसऱ्यांदा वाढवली आहे.
यापूर्वी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै होती, जी वाढवून 31 ऑगस्ट केली होती. केन्द्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डा (सीबीआईसी) ने एका ट्वीट मध्ये सांगितले की, ‘‘ आर्थिक वर्ष 2019- 20 चा जीएसटीआर 4 भरण्याची अंतिम तारीख वाढवून 31 ऑक्टोोबर 2020 केली आहे.’’
माल तसेच सेवाकर (जीएसटी) अंतर्गत कोणताही करदता, ज्याचे वार्षिक उत्पन्न दीड करोड रुपयापर्यंत आहे तो कंपाजीशन योजनेचा वापर करु शकतो. या योजनेअंतर्गत येणारे विनिर्माता आणि व्याापाऱ्यांना एक टक्का दराने जीएसटी भरावा लागतो, तर एल्कोहल न देणाऱ्या रेस्टॉरंटना पाच टक्के दराने जीएसटी भरावा लागतो.
अलीकडेच कोरोना वायरस संक्रमण पाहता सरकारने जीएसटी रिटर्न भरण्यात विलंब झाल्यास असणारी लेट फी माफ केली आहे. जीएसटी काउंसिल च्या 40 व्या बैठकीमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, जुलै 2017 ते जानेवरी 2020 च्या दरम्यान जीरो टैक्स वाल्या रजिस्टर्ड प्लांटस ना उशिरा रिटर्न फाइल करण्यावर कोणतीही लेट फीस द्यावी लागणार नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.