देहरादून: गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित उस थकबाकीबाबत शेतकरी सरकारवर दबाव टाकत होते आणि आता त्यांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी उस शेतकर्यांचे पैसे देण्यासाठी 193.24 करोड रुपयांचा निधी वाटप केला आहे. या निधीतून शेतकर्यांचे उर्वरीत पैसे भागवले जातील. उस शेतकरी, त्यांचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना आग्रह केला होता की, उस थकबाकीचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करावा. हे लक्षात घेवून रावत यांनी शेतकर्यांच्या हितार्थ हा निधी मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री रावत यांनी सांगितले की, उस शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचे वेळेवर पैसे दिले जावेत. त्यांनी साखर कारखान्यांच्या सुधारणेबाबत आणि उस शेतकर्यां समोर असणार्या समस्यांना त्वरीत मिटवण्यासाठी प्रभावी उपायांसाठी आदेश जारी केले आहेत. रावत यांनी सांगितले की, शेतकर्यांच्या हिताची रक्षा करणे ही माझी प्राथमिकता आहे. यासाठी शेतकर्यांच्या हितार्थ योजनां कार्यन्वित झाल्या पाहिजेत. उसाच्या शेतीच्या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल, यावरही लक्ष केंद्रीत करावे. मुख्यमंत्री रावत पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांना आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यावरही लक्ष दिले पाहिजे. जेणेकरुन भविष्यात कारखाने आपल्या स्तरावर शेतकर्यांची थकबाकी भागवू शकतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.