शामली :
गाव रसूलपूर गुजरान मध्ये भारतीय किसान यूनियन च्या संयुक्तविद्यमाने आयोजित बैठकीमध्ये भारतीय किसान यूनियन चे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सरकारवर निशाणा साधत शेतकर्यांच्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्याच्या मागणीबरोबरच शेतकर्यांना त्यांच्या हिताची लाढाई लढण्यासाठी भारतीय किसान यूनियन मध्ये सामिल होण्याची विनंतीही केली.
रसूलपूर गावात गोचर कल्याणकारी इंटर कॉलेजमध्ये भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मैनपाल चौहान यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये जिल्ह्यातील शेतकर्यांना संबोंधित करताना सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या चूकीच्या नितीमुळे शेतकरी त्रस्त आहे. विजेच्या वाढत्या बिलांनी शेतकर्यांची चिंता वाढवली आहे. त्यांनी सांगितले की आज राज्यामध्ये ऊसाचे पैसे वेळेत न मिळणे ही शेतकर्यांसाठी एक खूप मोठी समस्या बनली आहे.ते म्हणाले की, मोदीजींनी ऑनलाईन पेमेंट वाढवण्यावर जोर दिला होता ,तर सरकारने शेतकर्यांचे पैसेही व्याजाहसित ऑनलाईन जमा केले पाहिजेत. त्यांनी सांगितले की, भारतीय किसान यूनियन केंद्र सरकारकडून आणण्यात आलेल्या शेतकरी विरोधी अध्यादेशाचा विरोध करत आहे. सरकारने आपला अध्यादेश परत घ्यावा. बैठकीचे संचालन राष्ट्रीय उपाध्यक्ष मैनपाल चौहान आणि अध्यक्ष स्थानी नागर खाफ चे चौधऱी बाबा लज्जाराम नागर होते . दरम्यान माजी प्रधान राजपाल सिंह, प्रधान अरविंद कुमार, अनिल कुमार, विश्वास चौहान, ब्लॉक अध्यक्ष भंवर सिंह यांच्यसह शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.