औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य ऊसतोड वाहतुक कामगार आणि मुकादम संघटनेने मंगळवारी महाराष्ट्रातील ऊस मजुरांच्या मजुरीत दुप्पट वाढ देण्याची मागणी केली आहे. संघटनेने सांगितले की, शेतामध्ये ऊस तोडणीसाठी असणाऱ्या हार्वेस्टर मशीन्सना मजुरांच्या तुलनेत अधिक पैसे दिले जातात. ऊस तोडण्यासाठी श्रमिकांचे वेतन दुप्पट करण्याची मागणी केली असल्याचे संघटनेच्या सचिव सुशीला मोराले यांनी सांगितले. याशिवाय, श्रमिकांचा आरोग्य विमा प्रीमियम राज्य सरकार आणि साखर कारखान्यांकडून संयुक्त पद्धतीने भागवला जावा.
10 सप्टेंबरला मुंबईमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये राज्य सरकारचे अधिकारी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि ऊस क्षेत्रातील मजुरांच्या संघटनांनी सहभाग घेतला. त्यांनी सांगितले की, आम्ही साखर कारखान्यांकडून मजुरांसाठी चांगल्या दर्जाचे भोजन सवलतीच्या दरात आणि त्यांच्यासाठी चांगल्या जीवनशैलीची मागणी केली आहे. कोविड-19 महामारी पाहता कामगारांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था केली जावी.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.