लाहौर, पाकिस्तान: पाकिस्तानच्या पंजाब एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट ने राज्यातील 44 साखर कारखान्यांविरोधात कारवाई करण्याची तयारी केंली आहे. एसीई ला महासंचालक गोहर नफीस यांच्या सूचनेनुसार प्रांतातील विविध ऊस उत्पादक क्षेत्रांमध्ये आयोजित खुल्या कोर्टामध्ये शेतकर्यांकडून तक्रारी मिळाल्या आहेत. शेतकर्यांनी सांगितले की, कारखान्यांकडून ऊसाचे वजन करताना त्यांना लुटले जाते. एंटी करप्शन इस्टेब्लिशमेंट पंजाबला साखर कारखान्याविरोधात ऊस शेतकर्यांच्या कमीत कमी 2,507 तक्रारी मिळाल्या आहेत. नफीस यांनी सांगितले की, शेतकर्यांना कमीत कमी 1,363 तक्रारी सरकारकडून घोषित एफआरपीपेक्षा कमी पैसे देण्याच्या आणि 641 तक्रारी, पैसे न दिल्याच्या बाबतीत होत्या. बहुतेक तक्रारी दक्षिणी पंजाबकडून मिळाल्या.
चिन्योट जिल्ह्यातील एका शेतकर्याने साखर कारखान्यांकडून होणार्या शोषणाबाबत सांगितले. ऊसाचे वजन अवैधपणे घटवले जाते आणि आम्हाला सरकारकडून निर्धारीत किंमत दिली जात नाही,असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महासंचालक गोहर नफीस यांनी सांगितले की, तक्रारींवर कायदेशीर कारवाई बाबत होणार्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. यापूर्वी, पंतप्रधान इमरान खान यांनी स्थापन केलेल्या एका तपासणी आयोगाने साखर कारखान्यांकडून अपराधाच्या मालिकेचा एक रिपोर्ट तयार केला आहे, ज्यामध्ये अनुदानाचा दावा करण्यासाठी उत्पादन मूल्य कमी करणे, बाजारात हेराफेरी करणे, धोका देणे आणि शेतकर्यांचे शोषण करणे आदींचा समावेश होता.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.