सहारनपूर, उत्तर प्रदेश: आगामी गाळप हंगामामध्ये गेल्या सहा वर्षांपासून बंद शांकभरी साखर कारखाना जर सुरु झाला नाही तर शेतकरी त्या परिसरामध्ये समाधी घेतील,असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. भारतीय किसान यूनियन (लोकशक्ती) च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी शांकभरी साखर कारखाना टोडरपूर गेट वर धरणे आंदोलन करुन कारखाना चालू करण्याची मागणी केली.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनू चौधऱी यांनी सांगितले की, कारखाना बंद झाल्याने परिसरातील शेतकरी उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. कारखाना बंद झाल्याने शेतकर्यांना नाइलाजाने आत्महत्ये चा मार्ग स्विकारावा लागत आहे. त्यांनी सांगितले की, जर सात ऑक्टोबर च्या आधी प्रशासनाकडून कारखाना सुरु करण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर शेतकरी धरणे आंदोलन करुन आंदोलनस्थळी समाधी घेतील. शेतकर्यांनी कारखाना सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी बेहट यांच्याकडे दिले. एसडीएम देव यांनी सांगितले की, त्यांचे निवेदन शासनाकडे पाठवले आहे. शेतकरी व परिसराच्या हितार्थ हा साखर कारखाना सुरु करण्याचा पूर्ण प्रयत्न करु. यामध्ये अशोक राणा, योगेश चौधऱी, सोनी राणा, मंजीत चौधऱी, मेघराज सैनी, दर्शन लाल काम्बोज, हाजी मुकर्रम, ताहिर प्रधान, चौधरी हाशिम, आमिर आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.