बरेली, उत्तर प्रदेश: लखीमपूर खीरी जिल्हयातील पलिया गावामध्ये असलेल्या बजाज हिंदुस्थान साखर कारखान्यामध्ये एका मोठा पाण्याच्या टाकीत जवळपास 6 फुट लांबीची मगर घुसली होती. टाकीच्या देखभाल दुरुस्तीसाठी असलेल्या कर्मचार्यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना बोलावले आणि चार तासांच्या मोठ्या प्रयत्नानंतर मगरीला वाचवण्यात यश आले.
वीभागीय वन अधिकारी अनिल पटेल यानीं सांगितले की, हे मोठे कठीण अभियान होते, कारण टाकी 10 फुट खोल होती. आम्ही पहिल्यांदा दोन लोकांना आत पाठवले आणि त्यांनी मगरीला सावधपणे बांधले आणि मग मगरीला टाकीच्या बाहेर काढण्यात आले.
पटेल म्हणाले की, ही एक नर मगर होती, आणि जवळपास 3 वर्षांची होती. कदाचित पुराच्या पाण्याबरोबर साखर कारखान्याच्या आत पोचली असेल. सुदैवाने, मगरीने कुणाला हानी पोचवली नाही. आम्ही मगरीला शारदा नदीमध्ये सोडले आहे. खीरी तील नद्या दुधवा जंगलांमधून जातात आणि मगरीने भरलेल्या असतात. त्या पुराच्या पाण्याबरोबर गावातील तलाव आणि मानवी वस्तीपर्यंत पोचतात. गेल्या वर्षी, एका मगरीने पलिया शहरातील पोलिस स्टेशनमध्ये प्रवेश केला होता. एप्रिल पासून आतापर्यंत वन विभागाने 20 मगरींना वाचवले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.