नवी दिल्ली: भारतामध्ये कोरोनारुग्णांची संख्या 58 लाखावर पोचली आहे. तर यापैकी 47 लाखांपेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशामध्ये रुग्णांचा बरे होण्याचा दर 81.74 टक्के आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सकाळी आठ वाजता जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, एका दिवसामध्ये कोविड 19 चे 86,052 नवे रुग्ण समोर आल्यानंतर देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 58,18,570 झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये 1,141 आणखी लोकांच्या मृत्युनंतर, मृतांची संख्या वाढून 92,290 झाली आहे.
आकड्यांनुसार देशामंध्ये आतापर्यंत 47,56,164 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोविड 19 मुळे रुग्णांचा मृत्यु दर 1.59 टक्के झाला आहे. त्यानुसार देशामध्ये आता 9,70,116 रुग्णांवर कोरोनाचा उपचार सुरु आहे, जे प्रमाण एकूण रुग्णांपैकी 16.67 टक्के आहे.
भारतामध्ये कोविड 19 च्या केसेसचा आकडा सात ऑगस्टला 20 लाखावर, 23 ऑगस्टला 30 लाखावर, पाच सप्टेंबरला 40 लाखांवर आणि 16 सप्टेंबरला 50 लाखावर पोचला होता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनुसार देशामध्ये 24 सप्टेंबर पर्यंत एकूण 6,89,28,440 नमुन्यांची तपासणी करण्यात आली, यापैकी 14,92,409 नमुन्यांची तपासणी गुरुवारी करण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.