चंदगड, कोवाड : यावर्षी परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीने ऊस पिकाचे मोठे नुकसान केले आहे. चंदगड तालुक्यातील जोमात आलेल्या ऊसाच्या पिकाला ऐन भरणीच्या वेळीच पडलेल्या परतींच्या पावसाने मोठा झटका दिला. त्यामुळे ऊसाच्या एकरी उत्पादनावर परिणाम होणार असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चंदगड तालुक्यात ऊस हे उत्पन्न मिळवून देणारे हुकमी पीक आहे. तालुक्यात 10,500 हेक्टर जमीनीत ऊसाची लागवड केली आहे. पण यंदा सप्टेंबर महिना संपत आला तरी पावसाने पिच्छा सोडलेला नाही. ढगाळ वातावरणाने सुर्यप्रकाश कमी आणि पाऊस यामुळे ऊसाच्या वाढीवर मोठा परिणाम झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.