पीलीभीत, उत्तर प्रदेश: बीसलपूर येथील सहकारी कारखान्यामध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मूत्यु झाला, तर दूसरा जखमी झाला. काम करताना पाय घसरल्याने हे दोघेही 15 फुट उंचीवरुन अचानक जमीनीवर पडले. गंभीर जखमी असलेल्या युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची अवस्था खूपच नाजुक आहे.
साखर कारखान्यामध्ये या दिवसांमध्ये नव्या गाळप हंगामासाठी मशीनची साफ सफाई आणि दुरुस्तींचे काम सुरु आहे. या कार्याचा ठेका गोरखपूर ची कंपनी एमटेक यांना मिळाला आहे. कंपनीचे कामगार देवरिया जिल्ह्यातील थाना महुआ बारी अंतर्गत गाव भााटवार रानी येथील नागरीक दिनेश कुमार यादव आणि मनीष गुप्ता साखर कारखान्यामध्ये दुरुस्तीचे काम करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आले होते. तेव्हापून ते कारखान्यामध्ये काम करत आहेत.
शुक्रवारी रात्री दोन्ही कामगार साखर कारखाना यार्डमध्ये पॅन वर काम करत होते. अचानक पाय घसरल्याने दोन्ही कामगार जवळपास 15 फुट उंचावरुन खाली पडले. यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही सार्वजनिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आले. तिथे चिकित्सकांनी परीक्षणानंतर दिनेश ला मृत घोषित केले. मनीष यांची तब्येत नाजुक झाल्यामुळे त्याला प्राथमिक उपचार देवून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.