चेन्नई : चीनी मंडी
तमीळनाडूमध्ये गेल्या दोन हंगामात गरजेपेक्षा जास्त साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात प्रत्येक साखर कारखान्याला निर्यात सक्तीची करावी, अशी मागणी साखर कारखान्यांकडूनच होत आहे.
गेल्या सहा वर्षांत तमीळनाडूमध्ये पावसाच्या अहभावामुळे ऊस उत्पादन घटले आहे. २०१७-१८च्या हंगामात राज्यात केवळ लाख टन ऊस उत्पादन झाले होते. पण, उत्पादनाची क्षमता २७ टक्क्यांनी घटली. येत्या हंगामात साखर उत्पादन साडे आठ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यात उत्पादन क्षमता ३२ टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. घसरत्या उत्पादन क्षमतेमुळे तमीळनाडूची साखर प्रतिकिलो दहा रुपयांनी महाग होते.
केंद्र सरकारने नुकतेच साखर उद्योगासाठी एक पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) अंदाजानुसार आगामी हंगामात ३५० लाख टन साखर उत्पादन होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ३२० लाख टन उत्पादन झाले होते. आणि देशात साखरेची मागणी केवळ २६० लाख टन आहे. त्यामुळे सुमारे १०३ लाख टन साखर उत्पादन अतिरिक्त होणार आहे.
भारतीय बाजारपेठेला यंदाच्या हंगामात साखरेचा दर स्थिर हवा आहे, तसेच निर्यात वाढीची अपेक्षा असून, शेतकऱ्यांची देणी भागवण्याची अपेक्षा आहे. या संदर्भात इस्माचे महासंचालक अभिनाश वर्मा म्हणाले, ‘आम्ही कारखान्यांना निर्यात सक्तीच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहोत. त्याचबरोबर प्रत्येक साखर कारखान्याने त्यांना दिलेला निर्यात कोटा पूर्ण करणेही महत्त्वाचे आहे.’