बागहा ,बिहार: हरबोंडा नदीला आलेल्या भीषण पुरामुळे दी न्यू स्वदेशी साखर कारखाना नरकटियागंज येथे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे विशेष करून साखर कारखान्याचा बायो कंपोस्ट प्लांट नष्ट झाला आहे. त्याचबरोबर हजारीसह निवासी क्वार्टरचेही मोठे नुकसान झाले आहे. ही माहिती साखर कारखान्याचे कार्यकारी उपप्रमुख चंद्रमोहन यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, नदीच्या पुराचे पाणीजवळपास चार दिवसांपर्यंत बायो कम्पोस्ट प्लांट मध्ये भरल्यानंतर हळूहळू बाहेर पडले.
दुसरीकडे, साखर कारखान्याच्या हजारीसह काही निवासी क्वार्टर्समध्येही पुरामुळे हानी झाली आहे. चंद्रमोहन यांनी सांगितले की, कम्पोस्ट प्लांट मध्ये झालेल्या नुकसानीमुळे शेतकर्यांना वेळेत खत पुरवठा करण्यामध्ये अडचणी येवू शकतात. साखर कारखाना व्यवस्थापन याची विशेष तयारी करुन वेळेवर पुरवठा करण्याची तयारी करत आहे.
कार्यकारी उपप्रमुख मनोज कुमार सिंह यांनी सांगितले की, पाणी पूर्णपणे गेल्यानंतर पूरामुळे झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन केले जाईल. सिंह यांनी सांगितले की, बायो कम्पोस्ट प्लांट मध्ये शेतकर्यांच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात खत तयार करुन वितरीत करण्यासाठी ठेवले होते. परंतु पुरामुळे सारे काही बर्बाद झाले आहे. त्यांनी सांगितले की, बायो कम्पोस्ट प्लांटमध्ये व्यापक प्रमाणात तांत्रिक बिघाड झाल्याचीही शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.