कोल्हापूर: सध्या साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगमाची धामधुम सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावी परतलेले सीमाभागातील ऊस तोडणी मजूर आता जिल्ह्यात परतू लागले आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांचे मजूर अजून आले नसले तरी कर्नाटकातील कारखान्यांचे मजूर दाखल होत आहेत.
कर्नाटकात काही ऊसतोडणी चालकांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार्या ऊस तोडणीसाठी बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुर बोलवले आहेत. कर्नाटकात हुबळी, धारवाड, हल्याळ आणि दावणगिरी या भागात कारखान्यांचा हंगाम या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरु होणार आहे.
कर्नाटकातला गाळप हंगाम सुरु झाल्यानंतर महाराष्ट्रातील साखर कारखान्यात गाळप हंगामास सुरुवात होणार आहे. कदाचित यामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांत काम करणारे मजूर लवकर येण्याची शक्यता कमी आहे. त्यात अजूनही कोरोनाचे संक्रमण फैलावतच आहे. त्यामुळे हे मजूर 15 ऑक्टोबरनंतरच जिल्ह्यात कारखाना कार्यस्थळावर दाखल होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.