साखर उद्योगाशी संबंधीत विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गृहमंत्री अमित शाह यांची भेट

 

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनामध्ये केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली. फडणवीस, भाजपा आमदार राहुल कुल आणि एमएलसी रणजीत मोहिते पाटील यांनी सोमवारी दिल्लीं मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, आणि 15 ऑक्टोबर पासून सुरु होणार्‍या गाळप हंगामापूर्वी महाराष्ट्र साखर कारखानदारांसमोर आव्हानांवर चर्चा केली.

चार महिन्याच्या अवधीमध्ये, फडणवीस यांनी दुसर्‍यांदा केंद्र सरकारकडून राज्यामध्ये साखर उद्योगातील समस्यांना सोडवण्यासाठी हस्तक्षेपाचा आग्रह केला आहे. जुलैमध्ये, फडणवीस यांनी आमदार जयप्रकाश गोरे, माजी आमदार हर्षर्वधन पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या सह पक्षातील नेत्यांच्या एका मोठ्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्यांनी साखर उद्योगासाठी पॅकेज आणि उस शेतकर्‍यांसाठी एफआरपीची मागणी केली होती.

फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती ट्वीटरवरुन दिली आहे. फडणवीस यांनी ट्वीटरवर लिहिले आहे की, नवी दिल्लीमध्ये मा. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कर्ज पुनर्गठनासह साखर उद्योगाशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here