इस्लामाबाद: प्रांतीय मंत्रिमंडळाने मंगळवारी ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तान आणि पंजाब खाद्य विभागाला 151,700 टन साखर आयात करण्यास परवानगी दिली आहे. बैठक देशाच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री सरदार उस्मान बुजदार यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रांतीय मंत्री, विशेष सहायक, सल्लागार, मुख्य सचिव आणि संबंधित अधिक़ारी उपस्थित होते.
उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाच्या एका प्रतिनिधीने बैठक़ीत सांगितले की, खाजगी डिलर्स चा 4 नोव्हंंबर पर्यंत 0.445 मिलियन टन स्टॉल उपलब्ध होईल, तर सिंध उस आयुक्तांनी सांगितले की, एकूण स्टॉक 0.565 मिलियन टन साखर 9 नोव्हेंबर पर्यंत उपलब्ध होईल. पाकिस्तान च्या पंजाब सरकारच्या प्रतिनिधींनी बैठकीमध्ये सांगितले की, गाळप नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल, सिंध मध्ये उस गाळप नोव्हेंबर च्या मध्यापर्यंत सुरु होईल. प्रांतीय सरकार ने वेळेवर गाळप प्रक्रियेमध्ये गती आणण्यासाठी कायद्याच्या माध्यमातून मोठा दंड लावण्याचे ठरवले आहे. पंजाब च्या मुख्यमंत्री यांनी तस्करांविरोधात कारवाईचे आदेश दिले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.