सोलापूर जिल्ह्यात सहा इथेनॉल प्रकल्पांना मंजुरी

सोलापूर : चीनी मंडी
केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यात सहा नवीन इथेनॉल प्रकल्पांना मंजुररी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण इथेनॉल प्रकल्पांची संख्या २५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या १९ प्रकल्पांमधून ९ लाख १० हजार लिटर इथेनॉल तयार होते, तर नवीन सहा प्रकल्पांच्या माध्यमातून त्यात रोज ३ लाख २५ हजार लिटरची भर पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोज १२ लाख ३५ हजार लिटर इथेनॉल तयार होणार आहे.
युरोपियन शुगर, बबनरावजी शिंदे शुगर, गोकुळ शुगर, श्री संत कूर्मदास साखर कारखाना, विठ्ठल रिफार्इंड शुगर व मातोश्री लक्ष्मी शुगर या कारखान्यांसाठी केंद्राकडून डिस्टिलरी प्रकल्प मंजूर झाले आहेत. तसेच या योजनेतून विठ्ठलराव शिंदे सहकारी व विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव या प्रकल्पांच्या क्षमता वाढीस मंजुरी मिळाली आहे. अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार नव नवीन उपाययोजना करत आहे. त्यात साखर उत्पादनाला आळा घालण्यासाठी आणि देशाचा कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्यासाठी इथेनॉलला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांचे १६ आणि इतर तीन असे एकूण १९ प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना,
विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना, शंकर सहकारी, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील अनगर, लोकमंगल अॅनग्रो बीबीदारफळ, जकराया शुगर, सिद्धेश्वर सहकारी, युटोपियन शुगर,
पांडुरंग सहकारी, फॅबटेक शुगर, चंद्रभागा साखर कारखाना, विठ्ठल सहकारी गुरसाळे, सासवड माळी शुगर, मकाई सहकारी, इंद्रेश्वर शुगर या साखर कारखान्यांचा समावेश आहे. यासह ग्लोबस टेंभुर्णी, सिद्धनाथ टेंभुर्णी व खंडोबा टेंभुर्णी या तीन स्वतंत्र प्रकल्पांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नव्या आणि विस्तारित प्रकल्पांसाठी कर्जाच्या माध्यमातून ४६९ कोटी ५९ लाख रुपयेही मंजूर केले आहेत. हे कर्ज अल्पमुदतीचे असून, त्याच्या व्याजाचा भार केंद्र सरकार उचलणार आहे.

SOURCEChiniMandi

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here