तमिळनाडू मध्ये ऊस शेतकर्‍यांनी केली थकबाकी भागवण्याची मागणी

मदुरई, तमिळनाडू: वासुदेवनल्लूर स्थित साखर कारखान्याकडून गेल्या दोन वर्षांपासून ऊस थकबाकी भागवण्याच्या मागणीबाबत शेतकर्‍यांनी सोमवारी जिल्ह्याधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केले. ऊस शेतकर्‍यांनी थकीत देय मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तात्काळ पाऊल उचलण्याचा आग्रह केला.

किसान असोसिएशन फॉर नॅशनल साउथ इंडियन रिवर्स लिंकिंग चे अध्यक्ष पी अय्यकन्नू यांनी विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की, जे नेते निवडणूकी दरम्यान शेतकर्‍यांची भारताचा कणा अशा शद्बात कौतुक करत होते, आता तेच नेते शेतकर्‍यांचा कणा मोडत आहेत. वासुदेवनल्लूर येथील एका खाजगी साखर कारखान्याने दोन वर्षांपासून शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आलेल्या ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. त्यांनी सागितले की, केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येक वर्षी समुद्रात जाणार्‍या 1 लाख टीएमसी पाण्याचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here