मेरठ, उत्तर प्रदेश: पाला जाळण्यापासून रोखण्यासाठीच्या योजनेअंतर्गत शेतकर्यांना जागरुक केले जात आहे. या योजनेच्या अंतर्गत शेतांमध्ये पीक अवशेष न जाळणार्या शेतकर्यांना कृषी यंत्रांवर अनुदानासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याशिवाय पाला जाळल्यास शेतकर्यांचा ऊस सट्टा देखील रद्द केला जाईल. अर्थात अशा शेतकर्यांकडून साखर कारखाने ऊस खरेदी करणार नाहीत. यासाठी ऊस विभाग आणि कृषी विभाग दोघेही काम करतील.
शेतकर्यांना पंजीकरण करण्यासाठीही जागरुक केले जात आहे. गावामध्ये कृषी यंत्रांच्या खरेदीसाठी जागरुकता कार्यक्रम केले जात आहेत. याचे सर्वात मोठे कारण आहे की, शेतकर्यांनी शेतांमध्ये पाला जाळू नये आणि या यंत्रांपासून शेतांमध्येच वैरणीचा प्रश्न सोडवावा. यासाठी कृषी विभाग यंत्रांच्या खरेदीवर शेतकर्यांना अनुदानही उपलब्ध करुन देत आहे. शेतांमध्ये पीक अवशेष न जाळणार्या शेतकर्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभागाने ही नवी योजना बनवली आहे.
गेल्या एक महिन्यापासून कृषी विभाग शेतकर्यांना पाला न जाळण्याबाबत जागरुक करत आहे. यासाठी तहसील आणि ब्लॉक स्तरावर मेळावे आयोजित केले जात आहेत. तर विभागीय अधिकार्यांना कडक निर्देश आहेत की, जर कोणताही शेतकरी शेतांमध्ये पाला जाळत असेल तर त्यावर दंडाची कारवाई केली जावी. पाला न जाळणार्या शेतकर्यांना प्रोत्साहित करण्याचही योजना बनवली जात आहे.
पीकाच्या अवशेषाला मातीमध्ये मिसळणे आणि खाद्यामध्ये रुपांतर करणारे यंत्र शेतकर्यांना अनुदानावर देण्यात येत आहेत. नोंदणीकृत शेतकरी कृषी यंत्र रोटावेटर, हैप्पी सीडर पैडी स्ट्रा चॉपर, थ्रेडर, श्रब मास्टर, रिवर्सिबल, जीरो सीड कम फर्टिलायझर ड्रिल, सुपर स्टॉ मैनेजमेंट सिस्टम सारखी मशीन्स भारत सरकारकडून अधिग्रहित कंपनीकडून खेरदी करू शकतात. शेतकर्यांना या मशीन्सच्या खरेदीवर 50 ते 80 टक्केपर्यंत अनुदान दिले जाईल. एक कृषी यंत्र खरेदी करणार्या शेतकर्यांना 50 टक्के आणि तीन किवा त्यापेक्षा अधिक कृषी यंत्र एकदम खरेदी करणार्या शेतकर्यांना 80 टक्क्यापर्यंत अनुदान दिले जाईल. याशिवाय एफपीओ अंतर्गत रजिस्टर्ड शेतकर्यांनाही 80 टक्के अनुदान दिले होते.
जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रमोद सिरोही यांनी सांगितले की, शेतकर्यांना पाला जाळण्यापासून रोखण्यासाठी जागरुक केले जात आहे. प्रोमेशन ऑफ अॅग्रीकल्चर मैकेनाइझेशन फॉर इन सीटू मॅनेजमेंट ऑफ क्रॉप रेडीजयू योजनेअंतर्गत कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.
ऊस विभागाचे उपेंद्र सिंह यांनी सांगितले की, शेतांमध्ये ऊसाचा पाला जाळल्यास ऊसाचा सट्टा संपवला जाईल. यासाठी कारखान्यांना अशा शेतकर्यांची सूची पाठवली जाईल जे शेतांमध्ये ऊसाचा पाला जाळण्याचे काम करतील.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.