हैद्राबाद: तेलंगाना ची राजधानी हैद्राबाद सह अनेक ठिकाणी संततधार असलेल्या पावसामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. हैद्राबाद च्या रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. कुठे रुग्णालयांमध्ये पाणी भरले आहे. तर कुठे रस्त्यावर कार वाहून जाताना दिसून आली आहे. शेतांमध्ये पाणी भरल्याने पीकांचे नुकसान झाले आहे. बचाव आणि दिलासा अभियान सातत्याने सुरु आहे.
तेलंगना च्या काही भागामध्ये मोठा पाऊस पाहता मुख्यमंत्र्यांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सोमेश कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला सावध करण्यात आले आहे. हैद्राबाद च्या परिसरामध्ये गेल्या 24 तासात 20 सेंटीमीटर पर्यंत पाऊस नोंदवण्यात आला आहे.
हैद्राबादमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची भिती वर्तवली जात आहे. अनेक भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटीचा उपयोग केला जात आहे. राज्यातील आपतकालीन दिलासा फोर्स आणि फायर सर्विस टीम ने टोली चौकी परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करुन लोकांना बाहेर काढले आहे.
ग्रामीण भागामध्येही शेतांमद्ये पाणी भरल्यामुळे पीक नष्ट झाले आहे. तर अनेक ठिकाणी घर आणि रुग्णांलयांमध्येही पाणी भरले आहे. लोकांनाही सुरक्षा आणि सतर्कता बाळगण्याची सुचना करण्यात आली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.