एअर कंडिशनर्सच्या आयातीवर सरकारने बंदी घातली, देशांतर्गत उत्पादन वाढीसाठी घेतले पाऊल

नवी दिल्ली: सरकारने गुरुवारी रेफ्रिजंट्स च्या बरोबर एअर कंडिशनर च्या आयातीवर प्रतिबंध लागू केला आहे. देशांतर्गत उत्पादनाला गती देणे आणि गैर आवश्यक सामानाच्या आयातीमध्ये कमी आणण्याच्या हेतूने हे पाउल उचलले आहे. विदेश व्यापार महानिदेशालयाने एका अधिसूचनेमध्ये सांगितले की,रेफ्रिजंट्स सह एअर कंडिशनर च्या आयातीबाबत धोरणामध्ये बदल केला आहे. याअंतर्गत याला मुक्त श्रेणीतून हटवून प्रतिबंधात्मक सूची मध्ये घालण्यात आले आहे.
सरकार देशांतर्गत उत्पादनाला गती देणे आणि गैर आवश्यक सामानाच्या आयातीमध्ये कमी आणण्यासाठी पावले उचलत आहे. यापूर्वी, जूनमध्ये सरकार ने कार, बस आणि मोटसायकल मध्ये वापर होणार्‍या नव्या न्यूमैटिक टायर च्या आयातीवर प्रतिबंध लागू केला होता.

उल्लेखनीय आहे की, देशामध्ये एसी चा बाजार 5-6 अरब डॉलरचा आहे ज्यामध्ये अधिकतर भाग आयात होतो. एसी साठी भारत आपल्या गरजेची 28 टक्के आयात चीनमधून करतो.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here