मिरज: जोपर्यंत ऊसाचा दर आणि त्याबाबतचे धोरण अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत साखर कारखानदारांनी ऊसाच्या शेतात पाय ठेवायचा नाही, असे सांगून ,कर्नाटकातील एका कारखान्याचा तालुक्यातील ऊस नेण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला.
कोणताही गाळप परवाना नसताना या कारखान्याने हा प्रकार केला होता. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या संतप्त झालेल्या कार्यक़र्त्यांनी थेट ऊसाच्या फडात जावून तोडणी कामगार व वाहतुकदारांना पिटाळून लावले. सांगली जिल्ह्यातील ही ऊस शेतकरी आणि कारखानदारांमधील संघर्षाची पहिली ठिणगी आहे.
यावेळी ऊस दर निश्चित झाल्याशिवाय साखर कारखानदारांची गुंडगिरी चालू देणार नाही,असा इशारा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेव कोरे यांनी दिला. त्याचबरोबर कर्नाटकातील कारखान्यांनी प्रति टन चार हजार रुपये रोख द्यावेत आणि ऊस तोड करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी कमलेश्वर कांबळे, प्रदीप कार्वेकर, मारुती माळी, संजय कांबळे, मिलिंद खाडिलकर, शशिकांत गायकवाड, अरुण क्षिरसागर आदी उपस्थित होते
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.