इथेनॉल अर्थव्यवस्थेला बळकटी देईल : गडकरी

नवी दिल्ली : चीनी मंडी

साखर कारखाने आता, थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणार आहेत. एक सुरक्षित इंधन म्हणून त्याचा वापर होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे मत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी बस्ती येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.

शेतकऱ्यांनाही वीज आणि जैव इंधन बनवण्याचे तंत्रज्ञान पुरवले जाईल. सरकारने यापूर्वीच उसाच्या रसापासून इथेनॉल  तयार करायला परवानगी दिली आहे. बसेस, रिक्षा, दुचाकी इथेनॉल मिश्रित इंधनावर धावू लागतील, ते दिवस दूर राहिलेले नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

मंत्री गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी गडकरी बोलत होते. त्यानंतर सिद्धार्थ नगरमध्येही रस्त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश पोलिस खात्यात आणखी ५० हजार पोलिसांची भरती होणार असल्याची माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, चांगले रस्ते स्वच्छ पाणी आणि घरे या प्रमुख गरजांवर सरकार काम करत आहे. गेल्या चार वर्षांत केंद्र सरकारने खूप मोठे बदल घडवून आणल्याचे मतही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here