शामली, उत्तर प्रदेश: शुक्रवारी शहरातील नगरपालिका सभागृहात भारतीय किसान यूनियन च्या पदाधिकाऱ्यांनी एका बैठकीचे आयोजन केले. ज्याचे अध्यक्षस्थान स्विकारुन जिल्हाध्यक्ष कपील खाटियान यांनी सांगितले की, दिवाळी सह इतर सण तोंडावर आहेत, पण जिल्हयातील साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. ज्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यांनी सांगितले की, अनेकदा जिल्हा प्रशासनाने थकबाकी भागवण्याचे आश्वासन दिले, पण पैसे अजूनही मिळालेले नाहीत. यामुळे वैतागून येणाऱ्या 29 ऑक्टोबरला शामली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनिश्चितकालीन धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रदेश प्रवक्ता कुलदीप पंवार, मंडल अध्यक्ष भंवर सिंह, योगेन्द्र सिंह, गयूर हसन, ओमपाल सैनी, लाखन सिंह, दीपक शर्मा, पदम कैडी, अब्बास, मुनव्वर हसन, इमरान चैहान, असजद तोमर, सददाम भाटू, प्रदीप त्यागी, संजीव राठी, कुलदीप, फुरकान, गुडडु बनत, तालिब चौधरी आदि उपस्थित होते.
ऊस थकबाकी बाबत भाकियू ने दिला धरणे आंदोलनाचा इशारा
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.