मुंबई: महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्यातील पूरग्रस्त शेतकर्यांसाठी 10,000 करोड रुपयांच्या दिलासा पॅकेजची घोषणा केली. अवकाळी पावसामुळे राज्यामध्ये लाखो हेक्टर पीकांवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, दिवाळीपूर्वी शेतकर्यांना या निधीचे वाटप केले जाईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पूर आणि मोठ्या पावसावर आढावा बैठक घेतल्यानंतर ही घोषणा केली.
या आठवड्याच्या सु़रुवातीला, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यामध्ये पूरग्रस्त क्षेत्रांचा दौरा केला आणि शेतकर्यांना लवकरच दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पूरग्रस्त भागाचा दौरा केला आणि मागणी केली की, राज्य सरकारने लगेचच दिलासा पॅकेजची घोषणा करावी. मोठ्या पावसाने महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रातील काही भागात खूप मोठे नुकसान केले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि इतर जिल्ह्यामध्ये ऊस आणि इतर पीकांचे खूपच नुकसान झाले आहे. पावसामुळे ऊस गाळपावरही परिणाम झाला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.