देवरिया, उत्तर प्रदेश:उत्तर प्रदेशचे उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, बंद साखर कारखाने भाजपा सुरु करेल. सपा बसपा शासनकाळात हे साखर कारखाने बंद झाले होते. या दोन पक्षांच्या तिकडम पासून प्रदेशाचा विकास ठप्प झाला होता. भाजप सत्तेत आल्यावर विकासात गती आली. ते बुधवारी गौरीबाजारच्या चंद्रशेखर आजाद इंका च्या परिसरामध्ये देवरिया सदर विधानसभेच्या पोट निवडणुकांमध्ये भाजप उमेदवार डॉ. सत्यप्रकाश मणि त्रिपाठी यांच्या सभेमध्ये जनसभेला संबोधित करत होते.
आपल्या 20 मिनीटांच्या भाषणामध्ये मौर्य यांनी विरोधी पक्षांच्यवर निशाणा साधला, त्यांनी सपा, बसपा च्या 15 वर्षांच्या शासनाची तुलना भाजपाच्या तीन वर्षाच्या सरकारशी केली, या दोन सरकारांनी साखर कारखान्यांना टाळे लावून ते विकून टाकले. आता भाजपा एक एक करुन साखर कारखाने सुरु करत आहे. येणार्या दिवसांमध्ये देवरिया येथील बंद साखर कारखानेही सुरु होतील. मौर्य यांनी सांगितले की, मोदींच्या सहा वर्षांचा कार्यकाळ काँग्रेसच्या साठ वर्षांवर भारी आहे.
भाजपने सर्व घटकांसाठी काम केले. त्यांनी सांगितले की, भाजपाने मागासवर्गीय आणि दलितांसाठी सर्वाधिक काम केले आहे,गरीबीला मूळापासून संपवण्याच्या धोरणावर भाजप काम करत आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने या दिशेमध्ये महत्वपूर्ण काम केले आहे.
ते पुढे म्हणाले की ,आज जम्मू काश्मीर मध्ये कोणीही जमीन खरेदी करु शकतो. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे असे होवू शकले आहे. जर कलम 370 हटवले नसते तर हे कधीही शक्य झाले नसते . जनसभेला भाजपा जिल्हाध्यक्ष अन्तर्यामी सिंह, शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी, राज्य मंत्री जयप्रकाश निषाद, आमदार संगीता यादव, खासदार रामापति राम त्रिपाठी, माजी आमदार रविंद्र प्रताप मल्ल, मंत्री श्रीराम चौहान, कैबिनेट मंत्री सूर्य प्रताप शाही, विजय राजभर, शैलेश मणि त्रिपाठी, धमेंद्र सिंह, संजय सिंह यांनीही मनोगत व्यक्त केले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.