अदिस, अबाबा: इथियोपिया च्या आर्थिक मंत्रालयाने घोषणा केली की, दहा साखर कारखान्यांच्या खाजगीकरणाची तयारी सुरु आहे. मंत्रालयाने यावर जोर दिला की, हा निर्णय देशासाठी खूप फायदेशीर आहे. खाजगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वूलिट, बेल्स वन आणि टू आणि केसेम साखर कारखान्याचे खाजगीकरण केले जाईल. वित्त मंत्रालयाचे सल्लागार, ब्रूक ताय (पीएचडी) यांनी सांगितले की, इथियोपियातील तेरा साखर कारखान्यां पैकी दहा कारखान्यांचे खाजगीकरण केले जाईल.
यासाठी कारखान्यांची सद्यस्थिती आणि तांत्रिक मूल्यांकन करण्यात आले आहे. इथियोपिया ने दोन वर्षापूर्वी साखर कारखान्यांच्या खाजगीकरणाची सुरुवात केली होती, पण आतापर्यंत कोणत्याही साखर कारखान्याचे खाजगीकरण करण्यात आले नव्हते. डॉ. ब्रूक यांनी सांगितले की, कारखान्यांच्या खाजगीकरणाला अंतिम रुप देण्याचा प्रयत्न सुरु आहे. आतापर्यंत, तीस कंपन्यांनी खाजगीकरणाच्या प्रक्रियामध्ये भाग घेण्यात रस दाखवला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.