हरियाणा: ऊस शेतकर्‍यांना गेल्या हंगामातील थकबाकीची प्रतिक्षा, 8 नोव्हेंबरला महापंचायत

अंबाला, हरियाणा: नारायणगढ साखर कारखान्याचा आगामी गाळप हंगाम नोव्हेंबर मध्ये सुरु होईल, पण एप्रिल मध्ये संपलेल्या गेल्या गाळप हंमातील शेतकर्‍यांची थकबाकी अद्यापही बाकी आहे.

नारायणगढ साखर कारखान्यामध्ये गाळप हंगाम गेल्या वर्षी 12 नोव्हेंबर ला सुरु झाला होता आणि कारखान्याने जवळपास 55.33 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले होते. हंगाम 23 एप्रिल ला संपला आणि 387 करोड रुपयाच्या पोस्ट डेटेड चेक सहित 167 करोड रुपयांची ऊस थकबाकी भागवण्यात आली. नारायणगढ साखर कारखान्याकडून ऊस थकबाकी भागवण्यात विलंबानंतर ऊस शेतकर्‍यांनी शुक्रवारी शहजादपूर धान्य बाजारामध्ये बैठक घेतली आणि उर्वरीत देयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी 8 नोव्हेंबर ला महापंचायतीचा निर्णय घेतला आहे.

भारतीय किसान यूनियन (चारुनी) चे प्रवक्ते राजीव शर्मा यांनी सांगितले की, गेल्या गाळप हंगामातील जवळपास 19 करोड रुपये देय बाकी आहे. कारखान्याने घोषणा केली की, ते पुढच्या हंगामासाठी 20 ते 25 नोव्हेंबर दरम्यान परिचालन सुरु करतील, पण आम्ही मागणी करतो की, परिचालन दुसर्‍या आठवड्यापासून सुरु झाले पाहिजे. हंगामात विलंब होत आहे,त्यामुळे शेतकर्‍यांना गव्हाची लागवड करण्यासाठी खूपच कमी वेळ मिळेल. भविष्यातील कारवाईच्या निर्णयासाठी 8 नोव्हेंबरला एक महापंचायत बोलवण्यात आली आहे.

शुक्रवारी शेतकर्‍यांची भेट घेणाऱ्या एसडीएम नारायणगढ वैशाली शर्मा यांनी सांगितले की, आपण नियमित आधारावर थकबाकी भागवण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरुवारी 35.73 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. कारखाना 20 नोव्हेंबरपासून परिचालन सुरु करेल आणि थकबाकी योग्य वेळेत भागवली जाईल. विज उत्पादन भागवण्यासाठी कारखान्याला 7.5 करोड रुपये मिळणार आहेत. आम्हाला आशा आहे की, हे लवकरच होईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here