मुंबई: अर्थव्यवस्थेमध्ये रिकवरी चे संकेत सातत्याने दिसत आहेत. एकानंतर एक कंपन्या देखील पगारातील कपात मागे घेत आहेत आणि कर्मचार्यांना बोसनही देत आहेत. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी पगार कपात मागे घेतली आहे आणि या क्रमामध्ये आता Deloitte, PwC, EY आणि KPMG सारख्या 4 मोठ्या कंपन्यांनीही पगार कपात मागे घेणे सुरु केले आहे. तसेच या कंपन्यांनी कर्मचार्यांना बोनसही देणे सुरु केले आहे.
नवभारतटाइम्स.कॉम मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, एका कंपनीच्या अधिकार्याने सांगितले की, आता कमाई पुन्हा सुरु झाली आहे यासाठी आम्ही आमच्या कर्मचार्यांची पगार कपात बंद करुन बोनस वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडब्ल्यूसी ने सर्व कर्मचार्यांची पगार कपात मागे घेतली आहे, तर ईवाय इंडियाने आपल्या कर्मचार्यांना बोनस दिला आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.