सहारनपूर: गागलहेडी, गांगनौली, सरसावा आणि देवबंद नंतर रविवारी नानौता साखर कारखानाही सुरु झाला. कैराना खासदार प्रदीप चौधऱी यांनी चेन मध्ये उस घालून कारखान्याचा शुभारंभ केंला. दरम्यान सर्वात पहिल्यांदा उस घेवून येणार्या शेतकर्यांना सन्मानित करण्यात आले. आता सर्व साखरेचे संचालन झाले आहे.
रविवारी नानौता शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा वर्ष 2020-21 च्या गाळप हंगामाचा शुभारंभ मुख्य पाहुणे कैराना खासदार प्रदीप चौधरी एवं कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक डॉ. प्रशांत कुमार यांनी पूजा करुन चैन मध्ये उस घालून करण्यात आला. दरम्यान कारखान्यामध्ये पहिल्यांदा पोचलेले शेतकरी सोमपाल यांचा शाल आणि रोख पैसे देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी मैनेजर कुमार पुंडीर, डीसीडीएफ चेअरमन कृष्ण कुमार पुंडीर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच भूमिक विकास बँक चेअरमन अजीतसिंह राणा, मनोज राणा, प्रधान रामपाल सिंह, रविंद्र राणा, संजयवीर राणा, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत राणा, बिजेंद्र त्यागी, अशोक सहरावत, सुखपाल सिंह, चंद्रपाल सिंह राणा, भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजब सिंह, माजी चेअरमन प्रदीप राणा, चौधरी कंवर सिंह, कंवर सिंह, मौलवी जिक्रिया सिद्दीकी, माजी मंडलाध्यक्ष मोहर सिंह पुंडीर, प्रमोद राणा आदी शेतकरी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.