नवी दिल्ली: देशाच्या निर्यातीच्या कारभारात सुधार येण्याचे संकेंत आता दिसून येत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 6.75 अरब डॉलर ची निर्यात करण्यात आली जी वार्षिक आधारावर 22.47 टक्के वाढ दर्शवते. यामध्ये औैषध, रत्न तसेच अलंकार आणि इंजीनियर क्षेत्राचे मोठे योगदान राहिले. एका अधिकार्याने हे सांगितले.
एक वर्षापूर्वी नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये 5.51 अरब डॉलर ची निर्यात करण्यात आली होती. याप्रमाणे यावर्षी नोव्हेंबरमध्ये यामध्ये 1.25 डॉलरची वाढ झाली आहे. टक्क्यांमध्ये हा आकडा 22.47 राहिला आहे.
अधिकार्याने सांगितले की, 1 ते 7 नोंव्हेंबर 2020 च्या दरम्यान आयात 13.64 टक्के वाढून 9.30 अरब डॉलर राहिली जी एक वर्षापूर्वी या अवधीमध्ये 8.19 अरब डॉलर होती. आयातीमध्ये पेट्रोलियम ला सोडून इतर सामानाची आयात 23.37 टक्के वाढली आहे. व्यापारातील घाटा सांगितल्यास हा 2.55 अरब डॉलर आहे.
औषध, रत्न तसेच अलंकाराची निर्यात आलोच्य अवधीमद्ये क्रमश: 32 टक्के वाढून 13.91 करोड डॉलर, 88.8 टक्के वाढून 336.07 करोड डॉलर वर राहिली. याप्रकारे इंजीनियरींग सामानांची निर्यात 16.7 टक्के वाढून 21.51 करोड डॉलरवर पोचली.
दरम्यान, अमेरिका, हाँगकाँग आणि सिंगापूर ला निर्यातीमध्ये क्रमश: 54 टक्के, 176 टक्के आणि 91 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
नाव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या क्षेत्रांच्या निर्यात कारभारात घट झाली त्यामध्ये पेट्रोलियम, समुद्री उत्पादने आणि चामड्याचे साहित्य आदी प्रमुख आहेत. देशाच्या निर्यातीच्या कारभारामध्येही वाढ नोंदवण्यात आली होती पण ऑक्टोबर मध्ये यामध्ये पुन्हा घट झाली होती.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.