कुरुक्षेत्र: शाहाबाद आमदार आणि हरियाणा शुगर फेड चेअरमन राम करन काला यांनी मंगळवारी शाहाबाद सहकारी साखऱ कारखान्याच्या 37 व्या गाळप हंगामाचे उद्घाटन केले. त्यांनी सांगितले की, शेतकर्यांची प्रत्येक क्षेत्रात महत्वाची भूमिका आहे आणि त्यांना कारखान्यांना उस पोचवण्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येवू नये. या कारखान्याने केवळ हरियाणा च नाही तर पूर्ण भारतामध्ये आपल्या कार्यशैली मुळे विक्रम प्रस्थापित केला आहे. आणि हा कारखाना शेतकर्यांच्या खात्यात वेळेवर उसाचे पैसे जमा करतो.
शाहाबाद साखर कारखान्याचे प्रबंध निदेशक वीरेंद्र चौधऱी यांनी सांगितले की, 2020-21 च्या गाळप हंगामासाठी या कारखान्याने जवळपास 11 टक्के रिकवरीसह 80 लाख क्विंटल उसाचे गाळप करुन 8.80 लाख क्विंटल साखर उत्पादनाचे ध्येय ठेवले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा