कोल्हापूर दि 26 : कोल्हापूरमध्ये ऊस आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील कापशी या गावात सुरू असणारी ऊसतोड राखून रस्त्यावर आंदोलन केले. या वर्षीच्या ऊस गळीत हंगामामध्ये प्रतिटन उसाला 3600 रुपये पहिली उचल मिळावी अशी मागणी करत साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ अडवण्यात आली.
यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ऊस परिषदांना चांगले दिवस आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर जिल्ह्यात मोठे आंदोलन होतील असे चित्र असताना आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकात जाणारा ऊस अडवून रस्त्यावर काही वेळ चक्काजाम केला. उसाला पहिली उचल विनाकपात 3600 रुपये व अंतिम दर 4000 रुपये मिळावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.