नवी दिल्ली : चीनी मंडी
अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर मक्याची शेती केली जाते. मक्यापासून तयार करण्यात येणाऱ्या जैव इंधनाचा परिणाम ब्राझीलच्या इथेनॉल दरांवर होईल, असे मत ब्राझीलमधील नामवंत कंपन्यांनी व्यक्त केले आहे. त्यात बुन्गे शुगर, बायोएनर्जी आणि लुनसियाना टोर्रेसन या ब्राझीलधील बड्या कंपन्यांचा समावेश आहे.
अठराव्या डेटअॅग्रो परिषदेत एका प्रतिनिधीने म्हटले आहे की, जर, चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापारयुद्ध असेच सुरू राहिले, तर अमेरिकेतील शेतकरी सोयाबीन ऐवजी मक्याच्या शेतीला पसंती देतील. त्याचा परिणाम ब्राझीलमधील इथेनॉल दरांवर होईल.
जगभरात अनपेक्षित हवामानाचा परिणाम उसावर आणि साखर उद्योगावर होणार आहे. भारत आणि थायलंडमधील दुष्काळी परिस्थितीचे उदाहरण लुसियानाकडून देण्यात आले. याचा परिणाम २०१९-२०च्या जागतिक बाजारपेठेवर होणार आहे. पुढच्या वर्षी साखरेचा जागतिक बाजारातील दर, १३ ते १५ सेंटस प्रति पाऊंड राहण्याची शक्यता आहे. बोन्गे कंपनीच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार जगात येत्या पाच वर्षांत दर वर्षी १२० लाख टन साखरेची मागणी वाढणार आहे. बाजारपेठेची ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता ब्राझीलमध्ये आहे. पण, त्यासाठी उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.