आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑईल च्या दरावर दबाव कायम आहे. ब्रेेंट क्रूड ऑईल मध्ये खालच्या स्तारावरुन सुधारणा दिसून येत आहे. पण घरगुती वायदा बाजारात एमसीएक्स क्रूड मध्ये 2 टक्के घट दिसून आली आहे. ब्रेंट क्रूड वायदा खालच्या स्तरावरुन जवळपास 1.5 टक्क्यांची सुधारणा दिसत आहे.
तर आज भारतात पेट्रोल डिजेल च्या दरात कोणताही बदल नाही. सरकारी तेल कंपन्यांनी सलग 6 दिवसांपर्यंत पेट्रोल डिजेल चे दर वाढल्यानंतर आज सलग दुसर्या दिवसी कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 6 दिवसांमध्ये सोमवारपर्यंत पेट्रोल 1.37 रुपये आणि डिजेल 1.45 रुपये महाग झाले आहे.
दिल्लीमध्ये 20 नोव्हेंबर पासून आतापर्यंत 15 टप्प्यात पेट्रोलचे दर 2.65 रुपये वाढवण्यात आले आहेत. तर डिजेलच्या दरात 3.41 रुपये प्रति लिटर पर्यंत वाढ दिसून आली आहे.
पेट्रोल च्या किमतीमध्ये शेवटी 22 सप्टेंबर ला 7 ते 8 पैसे प्रति लीटर घट दिसून आली होती. 1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत डिजेलचे दर 3 रुपये प्रति लीटर पेक्षा अधिक कमी करण्यात आले होते. पण पेट्रोल च्या दरावर कोणताही परिणाम झाला नव्हता. ऑक्टोबर महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिजेलच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. तर ऑगस्ट मध्ये पेट्रोल आणि यापूर्वी जुलै महिन्यात डिजेलच्या रेटमध्ये वाढ करण्यात आली होती.
दिल्लीमध्ये आज 9 डिसेंबर ला पेट्रोल डिजेलच्या दरात बदल नाही. पट्रोल चे दर कालच्या दराच्या 83.71 रुपये प्रति लीटर आणि डिजेलचे दर कालप्रमाणेच 73.87 रुपये प्रति लीटर आहेत.
मुंबइंमध्ये पेट्रोल डिजेल चे दर स्थिर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 90.34 रुपये प्रति लीटर आहेत. डिजेल 80.51 रुपये लीटरवर विकले जात आहे.
कोलकातामध्ये पेट्रोल डिजेलच्या दरात कोणताही बदल नाही. पेट्रोलचा दर 85.19 रुपये प्रति लीटर आणि डिजेल चा दर 77.44 रुपये प्रति लीटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल डिजेलच्या दरात बदल केलेला नाही. पेट्रोलचा दर 86.51 रुपये प्रति लीटर आहे आणि डिजेलचा दर 79.21 रुपये प्रति लीटर आहे.
बेंगलुरु मध्येही पेट्रोल डिजेलच्या दरात कोणताही बदल नाही. पेट्रोलचा दर 86.51 रुपये प्रति लीटर तर डिजेलचा दर 78.31 रुपये प्रति लीटर आहे.