गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,005 इतके नवे रुग्ण, कोरोनामुक्तांची संख्या 93 लाखावर

नवी दिल्ली: देशामध्ये एका दिवसाच्या आत कोरोनाचे 30,005 नवे रुग्ण समोर आले आहेत. यामुळे एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 98.26 लाख झाला आहे. तर 93,24,328 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. मुक्त होण्याचा राष्ट्रीय दर वाढून शनिवारी 94.88 टक्के झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी आठ वाजण्याच्या आकड्यांनुसार देशामध्ये कोरोनाचे एकूण 98,26,775 रुग्ण झाले आहेत. 24 तासात 442 रुग्णांचा मृत्यु झाल्याने मृतांच्या संख्या वाढून 1,42,628 वर पोचली आहे.

या आकड्यांनुसार, कोविड 19 मुळे जिव गमावलेल्यांचा दर अधिक कमी झाला आहे. हा रेट आता 1.45 टक्के आहे. आकड्यांनुसार, देशामध्ये कोरोनामुळे संक्रमित 3,59,819 लोकांवर उपचार सुरु आहे. जो देशामध्ये संक्रमणाच्या एकूण रुग्णांच्या 3.66 टक्के आहे.

भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेनुसार 11 डिसेंबर पर्यंत एकूण 15,26,97,399 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यापैकी 10,65,176 नमुन्यांची तपासणी शुक्रवारी करण्यात आली.

गेल्या 24 तासात संक्रमणामुळे 442 लोकांचा मृत्यु झाला ज्यापैकी 87 महाराष्ट्रामध्ये, 60 जणांचा दिल्लीमध्ये, 50 जणांचा पश्‍चिम बंगालमध्ये, 29-29 जणांचा केरळ आणि पंजाबमध्ये, 23 जणांच हीरियणामध्ये, 16 जणांचा कर्नाटकमध्ये तसेच 14-14 जणांचा उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मध्ये मृत्यु झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here