नवी दिल्ली : चीनी मंडी
देशातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये साखरेचे भाव घसरले आहेत. देशातील साखर कारखान्यांवर स्थानिक बाजारात साखर विक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आला आहे. त्यांना स्थानिक बाजारातील विक्रीसाठी कोटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचा परिणाम साखरेच्या दरांवर दिसू लागला आहे.
दिल्लीमध्ये मध्यम दर्जाच्या साखरेची किंमत ३ हजार ४४० रुपये, तर मुझफ्फरनगरमध्ये ३ हजार ४०० रुपये किलो होती. या दोन्हीमध्ये वीस रुपयांची घसरण झाली आहे. साखरेचा पुरवठा बाजार व्यवस्थित करण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांवर विक्रीसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
ज्या साखर कारखन्यांकडे डिस्टलरीसह इथेनॉल उत्पादन सुविधा आहेत. ज्याद्वारे बी-ग्रेड मळीपासून इथेनॉल उत्पादन केले जाते. त्या कारखान्यांना साखर उत्पादनाचा बळी द्यावा लागतो. ते कारखाने दिलेल्या विक्री कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री करण्यास पात्र ठरतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
हंगामात साखर निर्यात करत असलेल्या कारखान्यांना देशांतर्गत बाजारातील विक्रीसाठीही महिन्याचा कोटा देण्यात आला आहे.
मिनिमम इंडिकेटिव्ह एक्सपोर्ट क्वांटिटि स्किम या योजने अंतर्गत साखर कारखान्यांनी त्यांना जाहीर करण्यात आलेल्या कोट्याची साखर विक्री करावी, अशा सूचना सरकारने साखर कारखान्यांना दिल्या आहेत.
सरकारने देशातील सर्व साखर कारखान्यांना मिळून ५० लाख टन साखर निर्यात करण्याचे टार्गेट दिले आहे. यासाठी कारखान्यांना त्यांचे तिमाही लक्ष्य निश्चित करावे लागणार असून, त्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाला द्यायची आहे. त्यावर मंत्रालय विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. जर, एखाद्या कारखान्याला तिमाहीमधील निर्यात टार्गेट पूर्ण करण्यात अपयश आले, तर त्यांना दिलेल्या महिन्याच्या कोट्यातून विक्री न झालेल्या साखरे एवढीच साखर समान तीन टप्प्यांत वजा केली जाणार आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीलाच इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाचा नवीन अनुमान लावला आहे. यापूर्वी ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज लावण्यात आला होता. त्यात बदल होत असून, यंदा भारतातील साखर उत्पादन ३१५ ते ३२० लाख टनापर्यंत मर्यादीत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या हंगामात देशात ३२३ लाख टन साखर उत्पादन झाले होते.