नवी दिल्ली: सरकार ने कारखान्यांना साखर निर्यातीबाबत मोठा दिलासा दिला आहे. आज झालेल्या कैबिनेट बैठकीमध्ये साखर निर्यातीवर अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. ज्याचा फायदा ना केवळ साखर कारखान्यांना आणी शेतकऱ्यांना पण मिळेल.
कैबिनेट कमेटी ऑन इकोनॉमिक अफेयर्स (CCEA) ने साखर कारखान्यांना 2020-21 हंगाामासाठी 60 लाख टन साखर निर्यातीबाबत 3,500 करोड़ रुपयांचे निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार च्या निर्णयाने साखर कारखान्यांना ऊस शेतकऱ्यांना थकबाकी भागवण्यात मदत होईल. यापूर्वीच्या हंगामात 2019- 20 मध्ये सरकार ने 10,448 रुपये प्रति टनाची निर्यात सब्सिडी दिली होती.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांनी सांगितले की, या वर्षी साखरेचे उत्पादन 310 लाख टन होईल. देशाचा वापर 260 लाख टन आहे. साखरेच्या किमती कमी झाल्याने शेतकरी आणि उद्योग संकटात आहेत. याला मात देण्यासाठी 60 लाख टन साखर निर्यात करणे आणि निर्यातीला सब्सिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, साखर निर्यातीमुळे मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.