कोल्हापूर : चीनी मंडी
साखर हंगाम आता सुरू झाला असून, देशात आणि देशा बाहेर साखरेची मोठ्या प्रमाणावर विक्री होणार आहे. त्यामुळे हा माल विक्री करताना खरेदीदार, विक्रेता आणि व्यापारी यांनी कोण कोणते निकष पाळावयाचे आहेत, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही एक नियमावली येथे प्रसिद्ध करत आहोत.
साखरेच्या पोत्याच्या वजनासंबंधी मार्गदर्शक तत्वे
१. टन किंवा मेट्रिक टन म्हणजेच १००० किलो किंवा २.२०४.६ इंग्लिश पाऊंड (आयबीएस)
२. ABOUT शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष वजनाच्या दोन टक्के कमी किंवा जास्त वजन. जेव्हा वजनाशी संबंधित उल्लेख करतानाABOUT हा शब्द वगळला असेल, तर त्या पोत्यातील साखर करारामध्ये उल्लेख केलेल्या वजनापेक्षा कमी असणार नाही.
३. साखरेचे वजन मशीनवर होणार असून, त्यात वजनामध्ये ०.१ टक्क्यांपेक्षा जास्त फरक असणार नाही
४. माल लोड होताना विक्रेता आणि डिस्चार्ज होताना खरेदीदार यांना वजनाशी संबंधित समाधानकारक सुविधा पुरविल्या जातील.
५. संबंधित सुपरवायझर दर २४ तासांनी वजन करणाऱ्या मशीन्सची तपासणी करून घेईल.
६. वजन होणाऱ्या साखरेचा साठा जास्त असेल तर, ज्या वाहनामध्ये साखर भरण्यात आली आहे, त्याचे प्रत्येक २४ तासांत दुसऱ्यांदा वजन केले जाईल. संबंधित वाहनाच्या वजनाचे वर्षातून एकदा प्रमाणपत्र घेतले जाईल
७. माल चढवताना साखरेच्या बॅगांचे वजन रँडमली तपासले जाईल. जर, वजनात एक टक्क्यापेक्षा कमी तफावत आली, तरच माल पुढे पाठवला जाईल. अन्यथा विक्रेता आणि खरेदीदार यांच्या समोरा-सोमर पोत्यांचे वजन केले जाईल.
पॅकिंग आणि सॅम्पलिंगची मार्गदर्शक तत्वे
पॅकिंग
जर, विक्रेता आणि खरेदीदार यांच्यातील करारामध्ये विशेष काही उल्लेख नसेल, तर आंतरराष्ट्रीय मानांकनाप्रमाणेच नव्या पोत्यांमध्ये साखरेचे पॅकिंग व्हावे. रस्ते, रेल्वे, जहाज कोणत्याही मार्गे त्याची वाहतूक सोयीस्कर होईल, असे पॅकिंग असणे महत्त्वाचे आहे. करारामध्ये उल्लेख असेल, तर पोत्यावर संबंधित मार्क असेल.
साखरेचा नमुना
प्रत्येक हजार टनामागे साखरेच्या मालाचा संमिश्र पद्धतीने नमुना घेतला जाईल अन्यथा त्या माला एक हिस्सा दर्जा तपासण्यासाठी घेतला जाईल. साखरेच्या पोत्यातून एक टक्क्यांपेक्षा जास्त नमुना घेतला जाऊ नये. त्यासाठी पोत्यांची निवडही रँडमली केली जाईल.
मालाचे विश्लेषण हे मान्यतापात्र रसायनतज्ज्ञांकडूनच केले जाईल. इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथर्ड ऑफ शुगर अॅनालिसिस या संस्थेच्या निकषांनुसारच मालाची तपासणी केली जाईल.
जर, खरेदी-विक्री करारामध्येच साखरेच्या रंगाचा उल्लेख असले, तरच रंगाची खात्री करून घेण्यासाठी इंटरनॅशनल कमिशन फॉर युनिफॉर्म मेथर्ड ऑफ शुगर अॅनालिसिस या संस्थेच्या क्रमांक ८च्या तपासणी पद्धतीचा वापर केला जाईल.
कामकाज कसे चालणार?
सर्वसाधारण माल वाहतुकीच्या प्रक्रियेत सुरुवातीलाच प्री शिपमेंट इन्सपेक्शन होतं. त्यानंतर कारखान्यातून रस्ते, रेल्वे मार्गाने जहाजापर्यंत माल पोहचवला जातो. अनेक निर्यातदार सुरुवातीची प्री शिपमेंट इन्सपेक्शन ही प्रक्रिया टाळतात. मुळात या प्रक्रियेमध्ये मालात काही अडचणी तृटी असतील, तर त्याच माहिती साखर कारखान्याच्या दारात मिळते. त्यामुळे पुढचा धोका टळतो.
पोत्यांच्या मार्केंगच्या आवश्कता.
१ पॅकिंग मजबूत १६० ग्रॅम वजनाच्या पॉली लाईन पीपी पोत्यातच केले जावे.
२ पोत्यावर शाकाहारी पदार्थाचा हिरव्या रंगाचा मार्क असणे अत्यावश्यक आहे.
३ पोत्याला कोणत्याही प्रकारचा हुक लावण्यात येऊ नये, असा सिंबॉल पोत्यावर असणे गरजेचे आहे
४ मालाचा ब्रॅंड नेम आणि त्याचा संबंधित लोगो पोत्यावर असावा. त्याच्या सविस्तर माहितीतून पोत्यात नेमका कोणता माल आहे, हे लक्षात यावे
५ साखर कोणत्या प्रकारची आहे, याचाही उल्लेख पोत्यावर असावा. उदा. पांढरी शुद्ध साखर
६ एफएसएसएआयचा लोगो आणि त्याचा परवाना क्रमांकही पोत्यावर असणे अत्यावश्यक आहे.
७ मालाचे नेमके वजन काय आहे, याचा उल्लेखही पोत्यावर असणे गरजेचे आहे
८ माल केव्हा तयार केला आणि केव्हा पॅकिंग केला, याचा उल्लेखही पोत्यावर असावा
९ जर माल तीन महिन्यांच्या काळापेक्षा जास्त चालणारा असेल, किंवा तीन महिन्याच्या आत वापरला जावा, असा असेल, तर माल तयार केल्याची आणि पॅकिंग केल्याची तारिख अतिशय महत्त्वाची ठरते.
१० त्याचबरोबर “BEST BEFORE …… MONTHS AND YEAR” किंवा “BEST BEFORE …….. MONTHS FROM PACKAGING” किंवा “BEST BEFORE …….MONTHS FROM MANUFACTURE”, असा उल्लेखही महत्त्वाचा आहे.
खरेदीदारांकडून येणाऱ्या सामान्य तक्रारी
– साखरेचे नमुने घेताना पांढऱ्या साखरेला थोडा पिवळसा रंग आल्याचे जाणवते. मुळात कारखान्यात उच्च तापमानाच्या खाली आल्यानंतर त्या साखरेत काहीसे पिवळसर पार्टिकल्स आढळतात.
– पिवळ्या पार्टिकल्स बरोबर काळे पार्टिकल्स सातत्याने साखरेच्या पोत्यांमध्ये आढळतात.
– अनेकदा पोत्याचे तोंड उघडलेले आढळते, त्याला खराब स्टिचिंग कारणीभूत असते.
– तसेच पोत्याला हुक लावल्याचे मार्क दिसतात
– कमी वजनाची पोती
– माल तयार केल्याची, तो पॅकिंग केल्याची किंवा त्याच्या मुदतीची तारीख नीट दिसत नसल्याची तक्रार असते.
– पोत्यावर पायांचे ठसे आढळतात.
– पोत्यांवर धूळ असते किंवा ती काळवंडलेली असतात
काय करावे?, काय करू नये?
– पोत्यांना कोणत्याही प्रकारचे हूक लावू नका
– माल पाठवण्यात येणारे ट्रक आणि रेल्वेच्या बोगी स्वच्छ करा
– ट्रकच्या नट बोल्टना धार आहे का याची पडताळी करा, अन्यथा त्यामुळे पोती फाटण्याची शक्यता असते.
– कोणत्याही परिस्थितीत पोती जमिनीवर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ओढत नेऊ नका
– माल चढवताना कंटनेरच्या दारात मॅट ठेवा, जेणे करून कामगारांच्या पायाची हाताची घाण पोत्यांना लागणार नाही
दर वेळी माल वेळेत पोहोचवण्याची घाई तुमच्या हाती चांगला परिणाम देईलच असे नाही. पण, माल स्वच्छ आणि निट नेटक्या पद्धतीने पोहचवला, तर आपल्याला हवा असलेला व्यवसायिक परिणाम त्यातून दिसून येतो.