सरकारने शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये आपल्या भागिदारीच्या विक्रीसाठी आमंत्रित केली बोली

नवी दिल्ली: सरकारने शिपिंग कॉरपोंरेशन ऑफ इंडिया मध्ये आपल्या 63.75 टक्के भागीदारीच्या धोरणात्मक गुंतवणूक अणि मैनेजमेंट कंट्रोल च्या ट्रान्सफर साठी मंगळवारी बोली आमंत्रित केली. गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभागाने यासाठी 13 फेब्रुवारी 2021 पर्यन्त संभावित खरेदीदारांकडून रुचिपत्र निमंत्रीत करण्यासाठी प्रारंभिक सूचना निवेदन जारी केले आहे.

सरकारकडून ईओआई निमंत्रीत केल्यानंतर शिपिंग कॉपोरेशन ऑफ इंडिया च्या शेयर मध्ये गती दिसून येत आहे.

मंगळवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर कंपनीचा शेयर 4.54 टक्के गतीने 86.30 वर ट्रेड करताना दिसून आला. सध्याच्या बाजार किमतीवर शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये सरकारची भागिदारी जवळपास 2,500 करोड रुपयांची आहे.

सरकारने विनिवेशाच्या प्रक्रियेच्या व्यवस्थापनासाठी आरबीएसए कैपिटल एडवायजर्स एलएलपी ला आपला देवाण घेवाण सल्लागार नियुक्त केले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आर्थिक बाबीच्या कैबिनेट कमेटीने शिपिंग कॉर्पोरेशन च्या धोरणात्मक विनिवेश साठी इन प्रिन्सीपल अप्रूवल दिले होते. कोरोना मुळे याला उशिर झाला.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या बजेटमध्ये 2.1 लाख करोड रुपयाच्या रेकॉर्ड विनिवेश चे लक्ष्य निश्‍चित झाले होते. सरकारने या आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्राच्या उद्यमांमध्ये अल्पसंख्यांक भागिदारीच्या विक्री आणि शेयर बायबैक च्या माध्यमातून 12,380 करोड रुपये जमा केले आहेत.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एअर इंडिया मध्ये धोरणात्मक विनिवेश ची प्रक्रिया सुरु आहे आणि दोन्हीही कंपन्यांना संभावित खरेदीदारांकडून अनेक ईओआई मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here