भारतामध्ये कोरोना च्या नव्या स्ट्रेनमुळे आतापर्यंत 25 लोक संक्रमित, दिल्लीमध्ये वाढली संदिग्धांची संख्या

नवी दिल्ली: भारतामध्ये ब्रिटेन मधून फैलावलेल्या कोरोना वायरसच्या नव्या स्ट्रेन चे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत देशामध्ये यामुळे 25 लोग संक्रमित झाले आहेत. आणखी पाच लोकांमध्ये नवा स्ट्रेन पहायला मिळाला आहे, यामुळे हा आकडा 20 ते 25 झाला आहे. एनआयव्ही, पुण्यातून चार नवे रुग्ण तर दिल्लीमध्ये 1 रुग्ण समोर आला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार, 25 लोकांना दिल्लीमध्ये आइसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे.

याबाबतीत एकट्या रजधानी दिल्लीमध्ये 8 लोग संक्रमित झाले आहेत. दिल्लीमध्ये यूके तून परतलेल्या तीन लोकांमध्ये नव्या स्ट्रेनची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुधवारी संदिग्ध रुग्णांची संख्या 38 वर पोचली. तीन नव्या संदिग्ध लोकांना लोकनायक जय प्रकाश रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विविध राज्यामंध्ये सहा लोंकांना नव्या स्ट्रेनमुळे संक्रमित होण्याची माहिती दिली होती. या नंतरच आणखी 14 लोकांना नव्या स्ट्रेन ची लागण झाल्याचे समोर आले होते. आरोग्य मंत्रालयानुसार, 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान ब्रिटेनमधून 33 हजार प्रवासी भारतात आले आहेत. यापैकी 114 लोक संक्रमित आढळून आले. यांचे सैंपल जीनोम सिक्वेंसिंग साठी सरकारी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल मध्ये आठ सैंपल, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स कल्याणी मध्ये एक, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोेलॉजी, पुण्यामध्ये एक, नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅन्ड न्यूरो साइंसेस हॉस्पिटल बेंगलुरु मध्ये सात, हैद्राबाद स्थित कोशिका तसेच आणविक जीवविज्ञान केंद्रामध्ये दोन, दिल्ली च्या इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अ‍ॅन्ड इंटीग्रेटीव बायोलॉजी मध्ये एक सैंपल मध्ये कोरोना चा नवा स्ट्रेन आढळून आला. या लोकांना कोरोना केयर सेंटर मध्ये सिंगल रुम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान ब्रिटेनमधून येणार्‍या जाणार्‍यांवर 7 जानेवारीपर्यंत अस्थायी प्रतिबंध लागू करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here